Typhoid Needs Attention

टायफॉइड हा केवळ साधा ताप नाही

गुंतागुंतीचा धोका पत्करण्याजोगा नाही. टायफॉइडचा धोका समजून घ्या, डॉक्टरांशी चर्चा करा आणि वेळेवर व योग्य कृती करा. स्वतःचे संरक्षण करा.

जगात सर्वाधिक टायफॉइड रुग्णांची संख्या भारतात आहे.*[1,2] तरीही, आपल्याला या आजाराबद्दल किती माहिती आहे?

जर योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाहीत, तर तुम्हालाही टायफॉइड होण्याचा धोका असू शकतो.

दरवर्षी जगभरात टायफॉइडचे सुमारे ४ ते ५ दशलक्ष रुग्ण नोंदवले जातात.[2]

टायफॉइडची लक्षणे सामान्यतः संसर्गानंतर १ ते २ आठवड्यांनी दिसून येतात.[1]

योग्य उपचार न झाल्यास टायफॉइडमुळे जवळपास 30% रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.[3]

*२०१७ ते २०२० दरम्यान संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, भारतावर जगातील टायफॉइडच्या एकूण भाराचा निम्म्याहून अधिक भार आहे. सद्यस्थितीतील माहिती बदललेली असू शकते.

स्रोत: John et al., NEJM 2023; Cao et al., JID 2021

टायफॉइड ही इतकी गंभीर आरोग्यसमस्या का आहे?

अँटिबायोटिकला प्रतिरोध

अँटिबायोटिकचा वाढता (बेफाम आणि अविचारी) वापर हा अँटिबायोटिक प्रतिकार (AMR) वाढण्याचे मुख्य कारण ठरत आहे. त्यामुळे औषधांना दाद न देणारे टायफॉइडचे जीवाणू निर्माण होतात. यामुळे गुंतागुंत वाढते आणि टायफॉइडवर वापरल्या जाणाऱ्या सामान्य औषधांनी उपचार करणे कठीण जाते.[6]

संपूर्ण शरीर यंत्रणेला होणारा संसर्ग

टायफॉइडचा संसर्ग आतड्यांपासून रक्तात आणि तिथून इतर अवयवांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे अनेक अवयवांवर परिणाम होतो. उपचार न केल्यास तीव्र लक्षणे आणि गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. यात प्रचंड त्रास होतो, शरीराचे खूप नुकसान होते आणि मृत्यूही होऊ शकतो.[7]

संसर्गजन्य

दूषित अन्न आणि पाण्यामुळे टायफॉइड पसरतो. विशेषतः ज्या भागात पाणी किंवा अन्न निर्जंतुक नाही, स्वच्छतेच्या सवयींचा स्तर खालवलेला आहे आणि स्वच्छता यंत्रणा वाईट आहे, तिथे टायफॉइडच्या साथीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हा आजार सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका ठरतो.[8]

वाहक अवस्था

बरे झाल्यानंतरही काही व्यक्तींच्या आतड्यांमध्ये त्यांच्या नकळत टायफॉइडचे जीवाणू राहू शकतात. हे जीवाणू पुढे पसरू शकतात, ज्यामुळे नवीन संसर्गाचा धोका कायम राहतो आणि आजारावर प्रभावी नियंत्रण आणणे कठीण होते.[8]

टायफॉइडचा प्रतिबंध करणे आवाक्यात आहे!

टायफॉइडपासून संरक्षण करण्यासाठी काही सोपे उपाय पुढीलप्रमाणे आहेत

लसीकरण

Vaccination

लस घ्या

वॉश (WASH) तंत्र (पाणी)

Consume clean drinking water

स्वच्छ पिण्याचे पाणी सेवन करा

वॉश (WASH) तंत्र (स्वच्छता)

Practice safe sanitation

सुरक्षित स्वच्छतेचा सराव करा

वॉश (WASH) तंत्र (हात धुण्याच्या सवयी)

Maintain hand hygiene and sanitation

चांगली हात धुण्याची सवय ठेवावी

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना टायफॉइडपासून सुरक्षित कसे ठेवायचे, ते जाणून घ्यायचे आहे?

तुम्हाला टायफॉइड होण्याची शक्यता आहे का?

टायफॉइड कोणालाही होऊ शकतो. आपल्याला वाटते की आपल्याला तो होणार नाही, पण या आजाराची तीव्र लक्षणे आणि गुंतागुंत धोकादायक असते. तुम्हाला टायफॉइडचा धोका किती आहे हे जाणून घेण्यासाठी ही छोटी चाचणी द्या.

तुम्हाला टायफॉइडबद्दल या गोष्टी माहीत असाव्या

चुकीची माहिती धोकादायक ठरू शकते. तथ्य जाणून घ्या, धोके समजून घ्या आणि तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य पावले उचला.

तुम्हाला टायफॉइडबद्दल या गोष्टी माहीत असाव्या

चुकीची माहिती धोकादायक ठरू शकते. तथ्य जाणून घ्या, धोके समजून घ्या आणि तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य पावले उचला.

Prevent Typhoid with Vaccines
टायफॉइडला प्रतिबंध करण्यासाठी लशीचा कसा उपयोग होतो?
अधिक वाचा
Typhoid from Street Food
रस्त्यावरील अन्न खाल्ल्याने तुम्हाला टायफॉइड होऊ शकतो का?
अधिक वाचा
Frame 2055245448 (5)
टायफॉइड कसा पसरतो आणि प्रत्येक पालकाने काय जाणून घेणे आवश्यक आहे
अधिक वाचा
Typhoid insights for healthcare professionals

सखोल माहिती:
वैद्यकीय पेशातील व्यक्तींसाठी टायफॉइडबद्दलचे बारकावे

टायफॉइडचे निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्यासाठी नवे संशोधन, साथीरोगशास्त्रीय डेटा, वैद्यकीय मार्गदर्शक तत्वे आणि शास्त्रीय आधार असलेल्या धोरणांची माहिती घेत राहा.

वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न

टायफॉइड म्हणजे काय?

टायफॉइड ताप हा सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. हा आजार दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतो. संसर्गित व्यक्तींमध्ये ताप हळूहळू वाढत जातो. त्यासोबत डोकेदुखी, पोटदुखी आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात.[6]

सतत येणारा ताप जो दिवसागणिक वाढत जातो, डोकेदुखी, तीव्र अशक्तपणा, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता किंवा अतिसार होणे ही टायफॉइडची सर्वात सामान्यपणे आढळून येणारी लक्षणे आहेत. [9]

टायफॉइडवर उपचार न केल्यास या तापामुळे आरोग्याची गुंभीर स्वरुपाची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यात आतड्यांमध्ये रक्तस्राव होणे किंवा छिद्र पडणे यांचा समावेश होतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये या संसर्गामुळे मेंदू, तसेच इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो.[10,7]

नाही, संक्रमित व्यक्तीच्या थेट किंवा साध्या संपर्कातून टायफॉइड ताप पसरत नाही. पण जर त्यांनी वापरलेल्या वस्तूंना तुम्ही स्पर्श केला, विशेषतः त्यांनी स्वच्छतागृहातून आल्यानंतर हात धुतले नसतील, तर तुम्हालाही टायफॉइड होण्याचा धोका असतो.[11]

टायफॉइडच्या उपचारांना सुरुवात केल्यावर काही दिवसांत आराम वाटू लागतो. ताप पूर्णपणे उतरण्यास सुमारे 10 दिवस लागतात. मात्र, थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यासाठी थोडा अधिक कालावधी लागू शकतो. जर गुंतागुंत निर्माण झाली किंवा आजार पुन्हा बळावला, तर बरे होण्यासाठी अधिक काळ लागू शकतो.[10]

टायफॉइड तापासाठी दोन प्रकारच्या लशी उपलब्ध आहेत:

  • टायफॉइड कॉन्ज्युगेट लस (Typhoid Conjugate Vaccine – TCV)
  • व्हाय पॉलिसॅकराईड लस (Vi Polysaccharide – Vi-PS) [11]

स्रोत

अस्वीकृती: भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यातर्फे एक जनजागृती उपक्रम. ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे व वैद्यकीय सल्ला मानली जाऊ नये. येथे दाखवलेले डॉक्टर, वैद्यकीय सुविधा आणि ग्राफिक्स केवळ उदाहरणासाठी दाखवले गेले आहेत. कोणताही वैद्यकीय सल्ला, प्रश्न किंवा आपल्या स्थितीबद्दलची शंका असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Scroll to Top