Typhoid Needs Attention

रस्त्यावरील अन्न खाल्ल्याने तुम्हाला टायफॉइड होऊ शकतो का?

टायफॉइडचा ताप हा जीवाणूजन्य संसर्ग आहे, जो दूषित अन्न व पाणी सेवन केल्यामुळे होतो. साल्मोनेला टायफी हा जीवाणू टायफॉइडसाठी जबाबदार असतो. तोमाणसाच्या आतड्यांमध्ये वाढतो आणि संसर्गित व्यक्ती (किंवा काही वेळा बरी झालेली व्यक्ती सुद्धा) विष्ठा किंवा लघवीद्वारे हे जीवाणू बाहेर टाकते. तेव्हा हा जीवाणू पसरतात. हे जीवाणू नंतर अन्न किंवा पाण्याच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतात.

टायफॉइडचा कसा पसरतो?

सहसा, संसर्गित व्यक्ती वैयक्तिक स्वच्छता पाळत नसेल तर तिच्या हातून तयार केलेले अन्न किंवा पेये साल्मोनेला टायफी या जीवाणूंनी दूषित होऊ शकतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने शौचालय वापरल्यानंतर हात धुतले नाहीत आणि त्यानंतर इतरांसाठी अन्न तयार केले, तर या अन्नातून इतरांना टायफॉइड होऊ शकतो. काही वेळा सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यानेही पाणी दूषित होऊ शकते.

रस्त्यावरील अन्न खाण्याचा धोका

घरी तयार केलेले अन्न सामान्यतः सुरक्षित मानले जाते, तर रस्त्यावर मिळणाऱ्या अन्नामधून संसर्ग होण्याचा धोका तुलनेने जास्त असतो. मात्र, ही गोष्ट नेहमीच खरी असेल असं नाही (कारण टायफॉइड घरच्या अन्नातूनही पसरू शकतो). घरी स्वयंपाक करताना स्वच्छतेच्या नियमांचे अधिक काटेकोर पालन केले जाते, तर रस्त्यावर अन्न तयार करताना अनेकदा स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. रस्त्यावरील अन्न दूषित होण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा रस्त्यावरील विक्रेते जे पाणी वापरतात ते न गाळलेले किंवा न उकळलेले असते. काही वेळा ते सुरक्षित पाणी वापरत असले तरी अन्न तयार करणाऱ्यांनी स्वयंपाकापूर्वी हात धुतलेले नसतात. कधी कधी भांडी धुण्यासाठी वापरलेले पाणीही अनेकदा निर्जंतुक नसते. काही वेळा हे विक्रेते पादचारी मार्गांवर किंवा रस्त्याच्या कडेला अस्वच्छ ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री करतात. अनेक रस्त्यावरील अन्नविक्रेते अन्न आकर्षक दिसावे म्हणून ते उघड्या शेल्फवर ठेवतात. मात्र, अशा प्रकारे अन्न उघड्यावर ठेवल्यास त्यावर माशा बसू शकतात, आणि माशा या टायफॉइडच्या संभाव्य वाहक असू शकतात.

मला स्वतःला कशा प्रकारे सुरक्षित ठेवता येईल?

रस्त्यावरचे अन्न खाताना टायफॉइडचा धोका कमी करण्यासाठी सुरक्षित खाण्याच्या काही सवयी आपण अवलंबू शकतो.

1. थंड किंवा कोमट अन्न टाळावे

तुम्ही खात असलेले अन्न व्यवस्थित शिजलेले आणि गरम वाढले गेले आहे याची खात्री करा. ज्या ठिकाणी अन्न आधीच तयार करून ठेवलेले असते आणि तुम्हाला देण्याआधी ते पुन्हा गरम केले जाते, अशी ठिकाणे टाळावी.

2. कच्ची फळे व भाज्या टाळाव्या

न धुता कापून विकलेली फळे आणि भाज्या टाळा. अशा अन्नपदार्थांची तयारी करताना ते दूषित होण्याची शक्यता असते. फळ खायचे असल्यास केळं, संत्रं यांसारखी सोलून खाता येणारी फळं निवडा.

3. अर्धे शिजलेले अन्न टाळावे

कच्ची किंवा अर्धवट शिजवलेली अंडी, मांस आणि मासे दूषित असण्याची शक्यता असते. तुम्हाला दिले जाणारे अन्न ताजे तयार केलेलं आणि पूर्णपणे शिजवलेले आहे याची खात्री करा.

4. न गाळलेले पाणी पिणे टाळा

टायफॉइड हा दूषित पाण्यामुळे पसरणारा आजार असल्यामुळे शुद्ध पाणी पिणे अत्यावश्यक आहे. पाण्याच्या गुणवत्तेविषयी खात्री नसेल, तर फक्त उकळलेले किंवा बाटलीबंद पाणीच प्या. तुम्ही जे अन्न खात आहात तेही गाळलेल्या, उकळलेल्या किंवा मिनरल वॉटरचा वापर करून तयार केलेलं आहे याची शक्यतो खात्री करा.

5. बर्फ घातलेली पेये टाळा

बर्फ तयार करताना वापरलेल्या पाण्याची खात्री नसेल, तर बर्फ घातलेली पेये टाळा. चहा किंवा कॉफीसारखी गरम पेये हा अधिक सुरक्षित पर्याय असेल.

6. पाश्चराइझ न केलेले दूध आणि दुग्धजन्य पदार्थ टाळा

पाश्चराइझ न केलेल्या दुधापासून तयार केलेली मिठाई, पेये आणि पदार्थ टाळा. शक्य असेल तर पाकिटातील दुधाचा (दूध पाश्चराइझ केले आहे असे लिहिलेले) वापरल्याची खात्री करून घ्या.

7. लस घेण्याचा विचार करा

ज्या ठिकाणी टायफॉइडचा ताप येण्याचे प्रमाण जास्त आहे, तिथे टायफॉइडची लस घेण्याचा विचार करणे हा संसर्ग टाळण्याचा एक चांगला मार्ग ठरू शकतो. तुमच्यासाठी कोणती लस योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तात्पर्य

रस्त्यावरील अन्न चविष्ट वाटू शकते, पण त्यासोबत काही धोकेही असतात. दूषित अन्न आणि पाण्यामुळे टायफॉइडचा प्रसार होतो. त्यामुळे कुठे आणि काय खायचे याची काळजी घेणे गरजेचे आहे. हात धुणे, ताजे शिजवलेले अन्न खाणे आणि गाळलेले पाणी पिणे यासारख्या मूलभूत स्वच्छतेच्या सवयींमुळे तुम्ही सुरक्षित राहण्यास मदत होते. शंका असल्यास घरचे अन्न खाणे किंवा स्वच्छतेचे निकष पाळणाऱ्या ठिकाणी जेवण करणे हा धोका कमी करू शकतो. लसीकरण केल्यास टायफॉइडचा धोका आणखी कमी होतो. थोडीशी काळजी घेतल्यास टायफॉइडसह इतर अन्नजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करता येते.

संबंधित वाचन

Frame 2055245448 (1)
टायफॉइडला प्रतिबंध करण्यासाठी लशीचा कसा उपयोग होतो?
लेख वाचा
Rectangle 61 (1)
रस्त्यावरील अन्न खाल्ल्याने तुम्हाला टायफॉइड होऊ शकतो का?
लेख वाचा
Frame 2055245448 (5)
टायफॉइड कसा पसरतो आणि प्रत्येक पालकाने काय जाणून घेणे आवश्यक आहे
लेख वाचा

स्रोत

अस्वीकृती: भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यातर्फे एक जनजागृती उपक्रम. ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे व वैद्यकीय सल्ला मानली जाऊ नये. येथे दाखवलेले डॉक्टर, वैद्यकीय सुविधा आणि ग्राफिक्स केवळ उदाहरणासाठी दाखवले गेले आहेत. कोणताही वैद्यकीय सल्ला, प्रश्न किंवा आपल्या स्थितीबद्दलची शंका असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Scroll to Top
This site is registered on wpml.org as a development site. Switch to a production site key to remove this banner.