Typhoid Needs Attention

टायफॉइड कसा पसरतो आणि प्रत्येक पालकाने काय जाणून घेणे आवश्यक आहे

टायफॉइड हा एक गंभीर आजार असून तो कोणालाही होऊ शकतो; मात्र अस्वच्छ आणि दूषित अन्न व पाण्याच्या संपर्कामुळे मुलांना हा आजार होण्याचा सर्वाधिक धोका असतो. पालक म्हणून, हा आजार कसा पसरतो, त्याचा प्रतिबंध कसा करता येतो आणि तुमच्या मुलांना त्यापासून सुरक्षित कसे ठेवता येईल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. या लेखात आपण टायफॉइडचा संसर्ग, त्याचा प्रतिबंध आणि नियंत्रण याबद्दल चर्चा करणार आहोत.

टायफॉइड कसा पसरतो?

टायफॉइड ताप सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू दूषित अन्न किंवा पाणी घेतल्यावर तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो. शरीरात गेल्यावर हा जीवाणू आतड्यांमार्फत रक्तप्रवाहात प्रवेश करून शरीरात पसरतो आणि ताप, तसेच इतर लक्षणे निर्माण होतात.

तुमच्या मुलाला टायफॉइड होण्याचे काही सामान्य मार्ग म्हणजे :

  • दूषित पाणी पिणे
  • रस्त्यावरील अस्वच्छ अन्न खाणे, विशेषतः जे अन्न गार अवस्थेत दिले जाते (उदा. फळे, चाट, गोड पदार्थ किंवा अल्पोपहाराचे असे पदार्थ जे बऱ्याच वेळापासून ठेवलेले असतात)
  • रस्त्यावर तयार केलेले आइसक्रीम किंवा बर्फाचे गोळे खाणे, कारण त्यात कदाचित न गाळलेले किंवा दूषित पाणी असू शकते
  • रस्त्यावर मिळणारा नीट स्वच्छता न पाळता तयार केलेला ऊसाचा किंवा फळांचा रस (बर्फ घालून किंवा न घालता) पिणे

दीर्घकालीन वाहक कोण असतात?

काही वेळा टायफॉइड बरा झाल्यावरही काही रुग्णांच्या पोटात जीवाणू असू शकतो. हा जीवाणू असला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा व्यक्तींना दीर्घकालीन वाहक म्हणतात आणि या व्यक्ती नकळतपणे जीवाणू पसरवत राहतात आणि इतरांन संसर्गित करतात. त्यांच्यामुळे समुदायामध्ये टायफॉइड पसरण्याचा मोठा धोका निर्माण होतो.

वाहक व्यक्तीकडून अस्वच्छ परिस्थितीत तयार केलेले अन्न जर मुलांनी खाल्ले, किंवा शाळेसारख्या ठिकाणी दीर्घकालीन वाहकाच्या अप्रत्यक्ष संपर्कात आले, तर त्यांना हा संसर्गजन्य आजार होऊ शकतो.

टायफॉइडची लक्षणे काय आहेत?

  • हळूहळू वाढणारा ताप, जो काही आठवडे टिकू शकतो
  • आळस किंवा सुस्तपणा
  • उलटी, जुलाब किंवा बद्धकोष्ठता
  • खोकला
  • काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये छातीवर हलकी लालसर पुरळ दिसू शकते

मच्या मुलामध्ये वरीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपचार न केल्यास टायफॉइडमुळे दीर्घकालीन गुंतागुंत उद्भवू शकते.

टायफॉइड एका मुलामधून दुसऱ्या मुलामध्ये पसरू शकतो का?

इतर अनेक संसर्गांप्रमाणे टायफॉइड थेट स्पर्शाने पसरत नाही किंवा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श केल्यास पसरत नाही. मात्र, तो अप्रत्यक्षपणे पसरू शकतो, विशेषतः स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास तो पसरू शकतो. उदाहरणार्थ, एखादे संक्रमित मूल शौचालय वापरल्यानंतर हात न धुता भावंडांशी खेळते, तोंडात हात घालते किंवा हात न धुता अन्न खाते, तर अशा परिस्थितीत इतरांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो.

टायफॉइडला प्रतिबंध कसा करावा?

तुमच्या मुलाला टायफॉइड होऊ नये यासाठी काही सोपे प्रतिबंधात्मक उपाय करू शकता, जसे की :
  • हात नियमितपणे धुणे, विशेषतः स्वयंपाक करण्यापूर्वी, अन्न वाढण्यापूर्वी किंवा जेवणापूर्वी.
  • शौचालय वापरल्यानंतर हात धुण्याची सवय त्यांच्या अंगी बाणवा.
  • उकळलेले किंवा गाळलेले पाणीच प्यावे, दूषित पाणी पिऊन ये, हे त्यांना शिकवा.
  • फळे व भाज्या नीट धुवा आणि सर्व अन्न व्यवस्थित शिजवा.
  • जर ते बाहेर अन्न खात असतील, तर कच्चे अन्न टाळा. संत्र, केळे यासारखी सोलता येणारी फळं किंवा ताजे शिजवलेले आणि गरम अन्न खाण्याचा सल्ला द्या.
  • लसीकरण करण्याचा विचार करा कारण हा रोगापासून त्यांचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

टायफॉइडच्या लसीकरणामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला कसं संरक्षण मिळू शकते?

टायफॉइडपासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. टायफॉइडमधून बरे झालेल्या रुग्णांना आजार पुन्हा होण्याचा धोका असतो. नैसर्गिक संसर्गामुळे टायफॉइडविरुद्ध दीर्घकालीन आणि पुरेशी प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. त्यामुळे तुम्हाला आधी टायफॉइड झाला असेल तरीही लस घेण्याचा सल्ला दिला जातो. लसीकरणामुळे दीर्घकालीन वाहकांमुळे होणाऱ्या संसर्गापासूनही संरक्षण मिळते आणि साथ पसरण्याला आळा बसून संपूर्ण समाजाचे संरक्षण होण्यास मदत होते.

निष्कर्ष

टायफॉइड हा गंभीर पण प्रतिबंध करता येण्यासारखा आजार आहे, जो दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो. टायफॉइड कसा पसरतो हे समजून घेतल्यास आणि स्वच्छतेच्या सवयी लावून घेतल्यास, निर्जंतुक अन्न व पाण्याचे सेवन केल्यास आणि लस घेतल्यास पालक आपल्या मुलांना संसर्गापासून मोठ्या प्रमाणात सुरक्षित ठेवू शकतात. टायफॉइडमुळे दीर्घकालीन गुंतागुंती होऊ शकतात आणि काही व्यक्ती नकळत आजाराचे वाहक बनू शकतात, म्हणून सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लसीकरण हा टायफॉइड आणि टायफॉइडची पुन्हा लागण होण्यापासून संरक्षण मिळवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे आपल्या प्रियजनांचे आरोग्य आणि भविष्य सुरक्षित राहील याची खात्री होते.

संबंधित वाचन

Frame 2055245448 (1)
टायफॉइडला प्रतिबंध करण्यासाठी लशीचा कसा उपयोग होतो?
लेख वाचा
Rectangle 61 (1)
रस्त्यावरील अन्न खाल्ल्याने तुम्हाला टायफॉइड होऊ शकतो का?
लेख वाचा
Frame 2055245448 (5)
टायफॉइड कसा पसरतो आणि प्रत्येक पालकाने काय जाणून घेणे आवश्यक आहे
लेख वाचा

स्रोत

अस्वीकृती: भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यातर्फे एक जनजागृती उपक्रम. ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे व वैद्यकीय सल्ला मानली जाऊ नये. येथे दाखवलेले डॉक्टर, वैद्यकीय सुविधा आणि ग्राफिक्स केवळ उदाहरणासाठी दाखवले गेले आहेत. कोणताही वैद्यकीय सल्ला, प्रश्न किंवा आपल्या स्थितीबद्दलची शंका असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Scroll to Top
This site is registered on wpml.org as a development site. Switch to a production site key to remove this banner.