टायफॉइडला प्रतिबंध कसा घालावा?
टायफॉइडपासून दूर राहण्याच्या काही सोप्या सवयी

टायफॉइडचा प्रसार मुख्यतः 4Fs मुळे होतो – माशी, बोटे, विष्ठा आणि संसर्गकारक वस्तू (म्हणजेच संक्रमित व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू).[1] स्वच्छ पाणी आणि स्वच्छता व्यवस्था नसलेल्या भागांमध्ये हा आजार वेगाने पसरतो.[2]
टायफॉइडचा प्रतिबंध करण्यासाठी तीन मुख्य गोष्टी करणे आवश्यक आहे:[3]

नियमितपणे हात धुणे

स्वच्छ अन्न आणि शुद्ध पाणी पिण्याच्या सवयी अंगीकारणे

लस घेणे
WASH शिष्टाचार
पिण्यायोग्य पाणी, योग्य स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता याची काळजी न घेतल्यास समुदायातील अनेक लोक आजारी पडू शकतात. टायफॉइडचा धोका कमी करण्यासाठी WASH प्रोटोकॉल (पाणी, स्वच्छता आणि आरोग्याच्या स्वच्छतेचे नियम) पाळणे महत्त्वाचे आहे. टायफॉइडसह इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी भक्कम WASH सुविधा अत्यावश्यक असतात.[1]

साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर अल्कोहोल समाविष्ट असलेले हँड सॅनिटायझर वापरावे[3]
अन्नपदार्थ व पेयांची सुरक्षितता

पेयांची सुरक्षितता[3]
- गाळलेले किंवा उकळलेले किंवा बाटलीत ठेवलेले पाणी (पाणी पिण्यापूर्वी किमान १ मिनिट उकळून घ्यावे) वापरा
- स्रोत माहीत नसलेले आइसक्रीम, पेप्सिकोला, कँडी किंवा बर्फ (मिनरल किंवा उकळलेल्या पाण्यापासून तयार केलेला) टाळा
- पाश्चराइझ न केलेले दूध पिणे टाळा

अन्नपदार्थ सुरक्षा[3,4]
- व्यवस्थित शिजवलेले पदार्थ खावे
- भाज्या किंवा फळे स्वच्छ पाण्यात नीट धुवून मगच वापरावी
- रस्त्यावरील पदार्थ ताजे, गरम व आरोग्याच्या स्वच्छतेचे नियम पाळून तयार केले नसतील तर ते टाळावे
- पाश्चराइझ न केलेले दुग्धजन्य पदार्थ टाळा
- पूर्णपणे न शिजवलेले अंड खाणे टाळा
लसीकरण
WASH प्रोटोकॉल देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचायला वेळ लागेल, मात्र लसीकरण वेगाने राबवता येते, हे आपण कोव्हिडच्या काळात पाहिले आहे. टायफॉइडचा धोका जास्त असलेल्या देशांनी प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरणाचा विचार करावा, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. यामुळे टायफॉइडची साथ होण्याचा धोका कमी होतो.[5]
भारतात टायफॉइडवर दोन प्रकारच्या लस उपलब्ध आहेत:[5]
टायफॉइड कॉन्ज्युगेट लस (टीसीव्ही)
ही एक टोचून दिली जाणारी लस आहे, ज्यामध्ये Vi पॉलिसॅकराइड अँटिजेन हा घटक एका वाहक प्रथिनाशी जोडलेला असतो.
Vi पॉलिसॅकराइड (Vi-PS) लस
ही टोचून दिली जाणारी लस आहे. यामध्ये केवळ शुद्ध केलेल्या Vi अँटिजेनवर आधारित अश्लेषित (इतर कोणत्याही घटकाशी न जोडलेले) पॉलिसॅकराइड वापरले जाते.
टायफॉइडवरील लसींची तुलना[5,6]
वैशिष्ट्य | टायफॉइड कॉन्ज्युगेटेड व्हॅक्सिन (टीसीव्ही)+ | Vi पॉलिसॅकराइड (Vi-PS) |
---|---|---|
परिणामकारकता | 87.1% पर्यंत | 55-61% |
वय | 6 महिने व त्याहून अधिक वय असलेल्या मुलांना देता येऊ शकते | 2 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या मुलांना देता येऊ शकते |
कशी देतात | इंजक्शन | इंजक्शन |
संरक्षण | किमान 7 वर्षे | कमाल 2 ते 3 वर्षे |
+Typbar-TCV संदर्भात करण्यात आलेल्या अभ्यासातून वरील कोष्टकासाठीचा डेटा घेतलेला आहे. इतर टीसीव्ही लशींसाठी असा डेटा अजून उपलब्ध नाही.
डब्ल्यूएचओ-सेज टायफॉईड लसीकरण कार्यगटाने ६ ते २३ महिन्यांतील मुलांना नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत टायफॉईड कॉन्जुगेट लस (टीसीव्ही) देण्याची शिफारस केली आहे.[6] ही लस दिल्यानंतर किमान २८ दिवसांनी संरक्षण देण्यास सुरूवात होते.
कृपया योग्य मात्रा जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.[7]
टायफॉइडचा ताप टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
WASH + लसीकरण हा टायफॉइडपासून संरक्षण मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आरोग्याच्या दृष्टीने करण्यात येणारी स्वच्छता आणि सार्वजनिक पातळीवरील स्वच्छता यात सुधारणा झाल्याने जोखीम कमी होईल, यासोबतच लसीकरण मोहीम राबविल्याने या जीवाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण प्रचंड कमी होऊ शकेल.
संबंधित पृष्ठे
स्रोत
- https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK557513/
- https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/typhoid
- https://www.cdc.gov/typhoid-fever/prevention/index.html
- https://www.dshs.texas.gov/sites/default/files/IDCU/investigation/electronic/EAIDG/2023/Typhoid-Fever-Salmonella-Typhi.pdf
- Purple Book: IAP Guidebook on Immunization 2022 By Advisory Committee on Vaccines and Immunization Practices (ACVIP)
- https://iris.who.int/bitstream/handle/10665/367354/WHO-IVB-2023.01-eng.pdf?sequence=1&isAllowed=y
- https://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(24)01494-6/fulltext
अस्वीकृती: भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यातर्फे एक जनजागृती उपक्रम. ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे व वैद्यकीय सल्ला मानली जाऊ नये. येथे दाखवलेले डॉक्टर, वैद्यकीय सुविधा आणि ग्राफिक्स केवळ उदाहरणासाठी दाखवले गेले आहेत. कोणताही वैद्यकीय सल्ला, प्रश्न किंवा आपल्या स्थितीबद्दलची शंका असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.