टायफॉइडची लक्षणे कोणती?
लक्षणांची लवकर ओळख झाल्यास गुंतागुंती टाळता येतात.

टायफॉइड किंवा आंत्रज्वराची लक्षणं जीवाणूच्या संसर्गानंतर १ ते ३ आठवड्यांच्या आत दिसू लागतात आणि काही दिवसांमध्ये किंवा आठवड्यांमध्ये हळूहळू तीव्र होऊ शकतात.
टायफॉइड तापाची लक्षणं आणि चिन्हं[1]

हळूहळू वाढणारा उच्च ताप (स्टेप लॅडर पद्धतीने वाढणारा)

डोकेदुखी

हुडहुडी भरणे

अशक्तपणा किंवा थकवा

भूक न लागणे

पोटदुखी

पुरळ किंवा डाग (मुख्यतः छातीवर किंवा पोटावर, गोऱ्या त्वचेवर अधिक ठळक दिसतात)

खोकला

अतिप्रमाणात घाम येणे

स्नायूंमध्ये वेदना

मळमळ वउलटी

अतिसार किंवा बद्धकोष्ठता
काळजी घ्या[2]
टायफॉइडचे जीवाणू शरीरात कोणतीही लक्षणे न देता राहू शकतो. याला लक्षणविरहित संसर्ग असे म्हणतात.
टायफॉइडचा उपचार न केल्यास गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात, ज्यामध्ये आंत्रातून रक्तस्राव, छिद्र पडणे आणि मेंदूला सूज येणे (ब्रेन इन्फ्लेमेशन) यांचा समावेश होतो, ज्यामुळे संभ्रम किंवा मानसिक विस्कळित अवस्था (सायकोसिस) निर्माण होऊ शकते.
लक्षणे दिसणे बंद झाले तरी काही व्यक्तींच्या शरीरात जीवाणू राहू शकतात आणि त्यांच्या मलावाटे नकळत इतरांना संसर्ग पसरवू शकतात.
